स्वच्छ सर्वेक्षणात शहर १६ व्या क्रमांकावर

Foto

हवेची गुणवत्ता सुधारली : 'स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६' मध्ये महापालिकेचे राष्ट्रीय स्तरावर यश
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहराच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केवळ प्रदूषण मोजण्याऐवजी स्रोतांवरच घाला घालण्याच्या महापालिकेच्या बहुआयामी प्रयत्नांना यंदा राष्ट्रीय स्तरावर दाद मिळाली आहे. रस्त्यांवरील धूळ नियंत्रण, बंदिस्त कचरा वाहतूक, कचरा जाळण्यास प्रतिबंध, ई-वाहनांचा वाढता वापर, बांधकामातील धुळीवर नियंत्रण आणि नियमभंगावरील दंडात्मक कारवाई या प्रभावी उपाययोजनांमुळे स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६मध्ये छत्रपती
संभाजीनगरने मागील वर्षीच्या ३४ व्या क्रमांकावरून थेट १६ व्या क्रमांकावर उल्लेखनीय झेप घेतली आहे.
देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ४८ शहरांच्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर शहराला २०० पैकी १७८ गुण मिळाले. मागील वर्षी शहराला १५५ गुण मिळाले होते. यंदा त्यात २३ गुणांची वाढ झाली आहे. शहराचा हवेचा गुणवत्ता निर्दे शांक (एक्यूआय) मागील वर्षीच्या ९९ वरून ७६ पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे क्रमवारीतील सुधारणा ही
केवळ कागदावरील गुणांची वाढ नसून प्रदूषणाच्या विविध स्रोतांवर केलेल्या उपाययोजनांचा परिणाम असल्याचे स्पष्ट होते. पाटणा शहरानेही छत्रपती संभाजीनगर शहराच्या बरोबरीने कामगिरी करत १७८ गुण मिळवून १६ वे स्थान मिळवले आहे. देशातील दहा लाखांवर लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत प्रथम स्थानी लखनौ (१९८), त्यानंतर इंदूर (१९७) आणि जबलपूर (१९५) या शहरांनी बाजी मारली, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी दिली.
१६ व्या क्रमांकावर झालेली झेप आणि १५५ वरून १७८ 66 गुणांपर्यंत झालेली वाढ हे उल्लेखनीय कामगिरी आहे. वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांवर अधिक प्रभावी नियंत्रण, पर्यावरणपूरक वाहतूक, सक्षम कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर पुढील काळात महापालिकेचा अधिक भर राहील.
अमोल येडगे, महापालिका आयुक्त
स्वच्छ वायू सर्वेक्षणातील कामगिरी महापालिकेच्या विविध विभागांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसोबतच नागरिकांच्या
66 सहभागाचे फलित आहे. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, धूळ नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनाच्या कामांना आणखी गती देऊन पुढील वर्षी अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न राहील.
- समीर राजूरकर, महापौर